जालना : टँकरद्वारे तात्पुरता पाणीपुरवठा न करता भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणी नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. हिकमतराव उढाण यांनी केले. जालना तालुक्यातील ४२ गावांसाठी पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येवर तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
जनावरांसाठी मंडळनिहाय चारा छावण्या सुरू कराव्यात, ओढे-नाले खोलीकरण व रुंदीकरण, बंधारे बांधणे या कामांना प्राधान्य देऊन पावसाचे पाणी जिरवण्याचे नियोजन करताना गावात किमान २०० जलतारा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी शेतकरी संवाद मेळावे घेण्याची आवश्यकता आमदार उढाण यांनी या वेळी व्यक्त केली.