‘शायना यांच्यावर गुन्हा दाखल करा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
खुलताबाद : शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून अपमान केल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी केली आहे. शायना एन. सी. यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला जात आहे. हा प्रकार महाराष्ट्र सहन करणार नाही, राज्य सरकारने शायना एन. सी. यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वरकड यांनी दिला.

आमदार बंब यांचा आजचा दौरा रद्द
खुलताबाद : आमदार प्रशांत बंब यांचा तालुक्यातील बाजारसावंगी जिल्हा परिषद गटातील २१ नोव्हेंबर रोजी शनिवारी होणारा नियोजित दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. हा दौरा आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर घेण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.

आमदार बंब हे विविध गावांना भेटी देऊन गावात मुक्कामी राहून नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी येणार होते.