ड्युटीहून परतताना सिन्नरच्या दोन होमगार्डचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील मूळ गावी विवाहासाठी जात असताना झालेल्या अपघातात श्रीरामपूर येथील वाग्दत्त वधूसह चौघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. शनिवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता मनमाड-येवला रस्त्यावर अनकवाडे शिवारात कंटेनरने कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जखमींवर मनमाड, येवला, मालेगाव आणि नाशिक येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील गोंडा आणि दुधोनिया येथील काही कुटुंबे व्यवसायानिमित्त पंधरा-वीस वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील हाफिजुन्निसा अब्दुल हकीम (वय २०, रा. श्रीरामपूर) हिचा उत्तर प्रदेशातील मूळ गावी विवाह ठरला होता. दोन दिवसांनी विवाह असल्यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक मनमाडहून रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना होणार होते. त्यासाठी ते खासगी झायलो कारने (क्र. एमएच १५ एफयू ३७६७) मनमाडकडे येत होते.पहाटे तीनच्या सुमारास मनमाड-येवला मार्गावर अनकवाडे परिसरातून कार जात असताना पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र. एचआर ४७ एच ७५५०) कारला जोरदार धडक दिली.
उर्वरित मजकूर...३
सिन्नर : छत्रपती संभाजीनगर येथील खाटू श्याम मंदिरातील उत्सवाची ड्युटी संपवून घराकडे परतणाऱ्या सिन्नर तालुक्यातील तीन गृहरक्षक दलाच्या जवानांवर काळाने घाला घातला. त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि. २०) साडेदहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात वैजापूर रस्त्यावरील कांदा मार्केटजवळ हा अपघात झाला. धडकेनंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. अमोल मधुकर रुकारी (३० रा. सोमठाणे, ता. सिन्नर) आणि महेश दिनकर कुर्हे (३१, रा. मऱ्हळ बुद्रुक, ता. सिन्नर) अशी मृतांची नावे आहेत. कुणाल शांताराम धोक्रट (रा. सोमठाणे) हा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात कारचालकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.