शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व्यवस्थापकाला निवेदन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
सिल्लोड : परिसरातील शेतकरी खातेदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व अडचणी सोडविण्यासाठी भराडी येथील युनियन बँकेच्या व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले आहे. पीक कर्ज, सोसायटीचे प्रलंबित अर्ज, थकीत खाते पुन्हा सुरू करणे; तसेच बोजा उतरवताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या या समस्या तातडीने मार्गी लागावीत, यासाठी जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण माधवराव काकडे आणि पंचायत समिती सदस्य शिवाजी खोमणे यांनी बँक प्रशासनाकडे निवेदन देऊन ठोस कार्यवाहीची मागणी केली.
या वेळी कैलास चाथे, सोमीनाथ जाधव, त्र्यंबक चाथे, प्रभाकर वाघ, नवनाथ राकडे, कैलास राकडे, राजू वाघ, संतोष पुंगळे, रमेश चाथे, रामेश्वर चाथे, अर्जुन चाथे, साहेबराव शेजुळ, दादाराव पांढरे, कौतिक शिरसाट, प्रकाश शेजुळ, प्रभाकर कदम, हरिभाऊ शेजुळ, देवेंद्र अग्रवाल, योगेश खोमणे, समाधान पाटील नेव्हारे, गणेश गुलाबराव शेजुळ आणि त्र्यंबक शेजुळ आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.