पदाधिकाऱ्यांचा आज सत्कार

Contributed by: म. टा. प्रतिनिधी,खुलताबाद|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते रविवारी (२२ नोव्हेंबर) खुलताबाद येथे दुपारी साडेतीन वाजता हा सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सत्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व आजी व माजी पदाधिकारी; तसेच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
या सोहळ्यात पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुका आणि जनसंपर्क मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.