प्रा. के. गणपती भट्ट यांचा आज सन्मान

Contributed by: म. टा. प्रतिनिधी बीड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
श्रीमद् जनीजनार्दन संस्थान, थोरले पाटांगण, बीड यांच्या वतीने आयोजित विद्वत् संगोष्ठी तथा पुरस्कार सोहळ्यात तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य प्रा. के. गणपती भट्ट यांना विद्वत् पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. वै. धुंडिराजशास्त्री पाटांगणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा सोहळा होत आहे.

श्री समर्थ वंशज भूषणस्वामी महाराज, सज्जनगड यांच्या हस्ते रविवारी (२२ नोव्हेंबर) प्रा. के. गणपती भट्ट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला श्रीक्षेत्र नवगण राजुरी येथील आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्रा. के. गणपती भट्ट हे दक्षिण भारतातील संस्कृत विद्वत् परंपरेतील महत्त्वाचे नाव असून या सोहळ्याला भाविक, अभ्यासक, विद्वान आणि नागरिकांनी थोरले पाटांगण येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.