‘विकास बिहारचीओळख होत आहे’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
वैशाली (बिहार) : ‘घोटाळे आणि गुन्हेगारी नव्हे, तर विकास आणि गुंतवणूक ही बिहारची ओळख होत आहे,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. वैशाली जिल्ह्यातील जाफरपट्टी येथे पंतप्रधानांच्या हस्ते ३४ हजार कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या १२ वर्षांत केंद्रातील ‘एनडीए’ सरकारच्या काळात ५० कोटी लोक गरिबीच्या विळख्यातून बाहेर आले,’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 सविस्तर वृत्त... फ्रंट पेज २
राज्यात तापमानाचा

पारा घसरला

मुंबई/पुणे : राज्यभरातील किमान तापमान शुक्रवारी खाली आले. मुंबईसह राज्याच्या इतर भागांतही किमान तापमानाचा पारा उतरला आहे. मध्य, महाराष्हही अधिक गारठला आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथेही किमान तापमानाचा पारा उतरला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका आणखी वाढला असून, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. शिवाजीनगर येथे ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात माळीण येथे सर्वांत कमी ८.९ अंश तापमान नोंदवण्यात आले.

 सविस्तर वृत्त... ७

दोन भारतीयांचा

कॅनडामध्ये मृत्यू

ओटावा : कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे शहरात वॉलमार्ट स्टोअरबाहेर झालेल्या गोळीबारात भारतीय वंशाच्या दोघांचा मृत्यू झाला. हा गोळीबार पूर्वनियोजित आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. गगनप्रीत ऊर्फ गॅरी रेहल (वय २३) आणि सुखजीतकौर (वय २४) अशी मृतांची नावे असल्याचे ‘इंटिग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन टीम’ने (आयएचआयटी) सांगितले.