कल्याण-डोंबिवली परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, अवैध कृत्यांना आळा घालणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने डोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेलार नाका झोपडपट्टीत शनिवारी रात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात दोन पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक आणि ३२ पोलीस अमलदार सहभागी झाले होते.
या कारवाईदरम्यान, अवैध हातभट्टी दार विक्री करणाऱ्या २ तर गांजा सेवन करणाऱ्या एका विदोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ तडीपार गुंडांची तर ८ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात अली.