आज पाच मार्ग बंद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
नागपूर : शहीद गोवारी स्मृतिदिनानिमित्त आज, सोमवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत पाच मार्गांवरील वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. शहीद गोवारी उड्डाणपूल (सीताबर्डी), संविधान चौक ते मॉरिस कॉलेज टी पॉइंट चौक, मानस चौक ते मॉरिस कॉलेज चौक, झाशी राणी चौक ते मॉरिस कॉलेज चौक आणि कन्नमवार चौक ते झिरो माइल हे मार्ग बंद राहतील. पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांनी डब्ल्यूएचसी रोड, तर पूर्वेकडे जाणाऱ्यांनी काँग्रेसनगर-धंतोली मार्गाचा वापर करावा. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.