Publication Of The Book Ek Hoti Maya Based On The Famous Maya Tigress Of Tadoba
‘एक होती माया’चे आज प्रकाशन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘ एक होती माया ’चे आज प्रकाशन मुंबई : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिद्ध ‘माया’ वाघिणीच्या रंजक व थरारक जीवन प्रवासाचा वेध घेणाऱ्या ‘एक होती माया : ताडोबाच्या राणीची नाट्यमय जीवनकहाणी’, या पुस्तकाचे आज गुरुवारी, संध्याकाळी ७.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर लघु नाट्यगृहात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.
अमली पदार्थप्रकरणी जलद सुनावणीमुंबई : अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी सहा ऑगस्ट रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायको ट्रॉपिक सबस्टान्सेस ॲक्ट अंतर्गत पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते.
‘कामाठीपुरा प्रकल्प आदर्श ठरेल’
मुंबई : ‘कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प गृहनिर्माण क्षेत्रात राज्याला दिशादर्शक आणि आदर्श ठरेल अशा पद्धतीने राबवावा. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कामाठीपुरा विकास समितीच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करावी’, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बुधवारी दिले.
‘नशेविरोधात
एकत्रित लढू’
मुंबई : ‘नशेचे व्यसन हे शरीरात आणि मनात शिरले, तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. नशा हा शरीर व समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे’, असे प्रतिपादन कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ‘नशेपासून पुढील पिढीला दूर ठेवण्यासाठी एकत्रितपणे लढणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता गुड टच आणि बॅड टच प्रमाणेच आता ‘गुड फ्रेंड’ व ‘बॅड फ्रेंड’मधील फरक समजून मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे’, असे ते म्हणाले.
वीजपुरवठा
दीड तास खंडित
ठाणे : ठाणे शहरातील वीजपुरवठा बुधवारी संध्याकाळी खंडित झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पोखरण रोड नंबर १, २ आणि रेमंड गृहसंकुलाच्या परिसरातील वीजपुरवठा दीड तास पूर्णपणे ठप्प झाला होता. अनेक टोलेजंग इमारतींमध्ये लिफ्ट बंद पडल्याने नागरिकही लिफ्टमध्ये अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या. २२ केव्ही कंडक्टर तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
सर्पदंशामुळे
महिलेचा मृत्यू वसई : विरारमध्ये सर्पदंशामुळे ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शैला ऊर्फ शार्लेट गोन्साल्विस असे तिचे नाव आहे. स्वयंपाकघरात काम करत असताना मंगळवारी पहाटे त्यांना सापाने दंश केला. कुटुंबीयांनी त्यांना आगाशीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.