Mumbais Temperature Rises Above 37 Degrees Again Residents Troubled By The Heat
पारा ३७ अंशांपार
Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबईमध्ये कमाल तापमानामध्ये दोन दिवस थोडी घट झाल्यानंतर सोमवारी पुन्हा कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला. त्यामुळे असह्य उकाड्याने मुंबईकर हैराण झाले.
सोमवारी कुलाबा येथे ३७.३ तर, सांताक्रूझ येथे ३७.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी अधिक होते, तर सांताक्रूझ येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.१ अंशांनी अधिक होते. दिवसभरात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने सोमवारी दिवसभरात उकाड्याचीही तीव्र जाणीव झाल्याचे मुंबईकरांनी सांगितले. कुलाबा येथील तापमान सोमवारचे राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले.मुंबईचे केवळ कमाल तापमानच नाही, तर किमान तापमानाही सोमवारी सकाळी चढेच होते. कुलाबा येथे २७.४ तर सांताक्रूझ येथे २५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे किमान तापमान सरासरीपेक्षा २.२ अंशांनी तर सांताक्रूझ येथील किमान तापमान १.५ अंशांनी अधिक होते.