जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा धमकी

Contributed by: ठाणे,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
jitendra avhad receives threats again demands z plus security
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आव्हाड यांनी मोबाइलवर आलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट ‘एक्स’वर शेअर करत ही माहिती दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अभिनेता सलमान खानच्या घरावर बिष्णोई टोळीकडून गोळीबार झाल्यानंतर आव्हाड यांना या टोळीकडून धमकी देण्यात आली होती. त्यावेळी आव्हाड ठाण्यातील घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्यानंतर आता अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतरही त्यांना पुन्हा धमकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

आव्हाड संविधानाच्या बाजूने भूमिका घेत असतात. त्यांच्या जीवाला धोका असून, त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी, अशी मागणी पक्ष प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सुरक्षा देण्याची मागणी पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.