कोकणात ‘अवकाळी’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
heavy rain and yellow alert in konkan
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. रविवारी सायंकाळी उशिरा रत्नागिरी शहर व चिपळूण परिसर परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणात वादळी वाऱ्यासह आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.