दादरच्या कोहिनूर इमारतीत आग

Contributed by: म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दादरच्या कोहिनूर इमारतीत आग
दादर पश्चिम येथील कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका हॉटेलच्या स्वयंपाकघरात सोमवारी सकाळी ९ वाजता आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलासह पोलिस, बेस्ट, आरोग्य विभाग आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. स. ९.२५ वाजता आग ‘लेव्हल-१’ म्हणून घोषित करण्यात आली. अग्निशमन दलाने आग स्वयंपाकघरापुरती मर्यादित ठेवत, काही वेळातच ती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.