एअर ॲम्ब्युलन्समधील रुग्णाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
death of indian woman in air ambulance caused by technical failure
ढाका :

ढाका : एअर ॲम्ब्युलन्सने प्रवास करणाऱ्या एका भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाचा दरवाजा हवेतच अंशतः उघडला गेला. त्यानंतर हे विमान बांगलादेशात तरवण्यात आले. विमानात दोन वैमानिक, एक रुग्ण, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक आणि दोन सोबतचे प्रवासी अशा एकूण सात व्यक्ती होत्या.
३१ आठवड्यांनंतर गर्भपातास परवानगी

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या १६वर्षीय मुलीचा ३१ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. अल्पवयीन मुलीवर बाळंतपणाचा आणि मूल संगोपनाचा भार टाकणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.