सत्ताधारी महायुतीला ‘गोकुळ’मध्ये धक्का

Contributed by: कोल्हापूर,म. टा. प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सत्ताधारी महायुतीला ‘गोकुळ’मध्ये धक्का
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना, उमेदवारांना धक्का देऊन काँग्रेसप्रणीत समविचारी आघाडीने सत्तेकडे वाटचाल केली. समविचारी आघाडीचे तेरा आणि महायुतीचे १२ उमेदवार निवडून आले. रात्री साडेआठ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर महायुतीने फेरमतमोजणीची मागणी केली; मात्र ती फेटाळण्यात आली.

गोकुळ निवडणुकीत गेले काही दिवस प्रचंड चुरस निर्माण झाली होती. काल ९९ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच २५ जागांसाठी मतमोजणी झाली. त्यामध्ये त्यामध्ये समविचारी आघाडीचे १३ उमेदवार निवडून आले. महायुतीचे बारा उमेदवार निवडून आले आहेत. प्रमुख पराभूतांमध्ये माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास नारायण पाटील आणि नाविद मुश्रीफ यांचा समावेश आहे. समविचारी आघाडीच्या वतीने अनेक नवीन चेहरे निवडून आले आहेत.
या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली. त्यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह दोन खासदार, दहा आमदार यांनी ताकद लावली होती; पण मतदारांनी महायुतीला धक्का देऊन समविचारी आघाडीला पसंती दिली.