बाजारपेठेत उत्साही वातावरण

Contributed by: पिंपरी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
enthusiastic atmosphere in the market for shopping on the occasion of dashara
घरांसह ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीच्या बाजारपेठेत विजयादशमीच्या (दसरा) निमित्ताने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, खरेदीवर त्याचा चांगला परिणाम होण्याची चिन्हे आहेत. गृहखरेदीसह सराफ आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रेत्यांनाही आज, मंगळवारी चांगली खरेदी होईल, असा अंदाज आहे.

आपट्याची पाने आणि झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांनी सोमवारी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. सोलापूर, सांगली, बीड आणि हिंगोली या भागांतून झेंडूच्या फुलांची आवक झाली. किरकोळ बाजारात झेंडूचे दर ७० ते १००, तर घाऊक बाजारात ३० ते ७० रुपये किलो दराने विक्री झाली. दरम्यान, सोमवारी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
 संबंधित वृत्त...प्लसमध्ये