१७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्घटनेनंतर राहा फरार होता. त्याने मोबाइल फोनही बंद केला होता. कुटुंबीय आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी तो वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले. संशयित आठ मोबाइल क्रमांकांचा माग काढून पोलिसांनी त्याचा शोध घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करण्याची गरज भासल्यास तसे केले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.