‘जिओ’च्या आयपीओसाठी एक कोटींहून अधिक अर्ज

Contributed by: वृत्तसंस्था,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
over one crore applications for jio ipo world record
‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या ‘आयपीओ’अंतर्गत समभाग खरेदीसाठी मागणी नोंदवणारे एक कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, इतक्या प्रचंड संख्येने अर्ज प्राप्त होणारा हा जगातील पहिला ‘आयपीओ’ ठरला आहे. यापूर्वी ‘वारी एनर्जीज’च्या ‘आयपीओ’साठी ९७ लाखांच्या आसपास अर्ज आले होते. हा जागतिक विक्रम ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ने मोडीत काढला आहे. अर्जांचा यापूर्वी नोंदवलेला जागतिक विक्रम या आकड्याने मोडला. ‘बजाज हाउसिंग फायनान्स’सारख्या यापूर्वीच्या ‘आयपीओं’नाही त्याने मागे टाकले.

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या ‘आयपीओ’ला ऑफरवरील १९.७५ कोटी समभागांच्या तुलनेत १३६.३२ कोटी समभागांसाठी बोली आल्या होत्या. हा जवळपास सातपट भरणा आहे. यामध्ये संस्थात्मक मागणी आघाडीवर आहे. पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी राखीव ४.९० कोटी समभागांच्या तुलनेत ७०.८५ कोटी समभागांसाठी बोली लावली. देशांतर्गत वित्तीय संस्थांचा (बँका, एफआय आणि विमा कंपन्या) वाटा ३४.५१ कोटी समभाग आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा २६.९५ कोटी समभाग होता.
म्युच्युअल फंड ४.४० कोटींसह बरेच कमी होते. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार ९.४५ पट होते. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांनी ऑफरवरील ८.५० कोटी समभागांच्या तुलनेत १७.१९ कोटी समभागांसाठी बोली लावली. भागधारकांचा राखीव हिस्सा ५.६८ पट आहे, तर कर्मचारी राखीव हिस्सा २.४८ पट आहे.