आंदोलक विद्यार्थ्यांना पालकांनी घेऊन जावे

Contributed by: वृत्तसंस्था,कोलकाता|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
srfti students protest parents urged to take them home
‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’चे (एसआरएफटीआय) विद्यार्थी १२ ऑक्टोबरपासून कुलगुरू संतोष अजमेरा यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत असून, त्यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसक घटनांनंतर बेमुदत धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन इन्स्टिट्यूटने केले आहे. चित्रपट; तसेच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचे वर्ग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

कॅम्पसमध्ये उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून झालेल्या कथित हल्ल्यांविरोधात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यासाठी संस्थेचे प्रशासन दबाव आणत असल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. मूलभूत सुविधांपासूनही प्रशासनाने आपल्याला वंचित ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी गुरुवारी केला होता.
२७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य आणि विद्यार्थ्यांमध्ये एका कार्यक्रमादरम्यान संघर्ष झाला होता. त्यानंतर चार ऑक्टोबर रोजी बंगीय हिंदू जागरण मंचाच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा कॅम्पसमध्ये झटापट झाली.