परकी चलनसाठ्यात पाच अब्ज डॉलरची घट

Contributed by: मुंबई,वृत्तसंस्था|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
five billion dollar decline in indias foreign currency reserves
परकी चलनसाठा १६ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात ५.०११ अब्ज डॉलरने घसरून ७२१.०१६ अब्ज डॉलरवर आल्याचे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले. याआधीच्या आठवड्यात हा चलनसाठा ८.५७८ अब्ज डॉलरने घसरून ७२६.०२७ अब्ज डॉलरवर आला होता.

चार सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात हा चलनसाठा ७८५.७०६ अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. परदेशातील भारतीयांकडून ठेवींसाठी विशेष सवलतीच्या ‘स्वॅप’चा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात डॉलरचा ओघ आल्याने ही वाढ झाली होती; ज्याद्वारे बँकांनी जवळपास विक्रमी १३३ अब्ज डॉलर उभारले होते. मात्र, तेव्हापासून चलनसाठ्यात घसरणीचा कल कायम आहे. १६ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात चलनसाठ्याचा प्रमुख घटक असलेली परकी चलन मत्ता ५.७५८ अब्ज डॉलरने घसरून ५९१.८४७ अब्ज डॉलरवर आली.