Cricket Olympic Qualification Tournament In January february 2028
ऑलिम्पिक क्रिकेट पात्रता जानेवारी-फेब्रुवारीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
नवी दिल्ली : लॉस एंजेलिसमध्ये २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमधील क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा जानेवारी-फेब्रुवारी २०२८मध्ये होतील. ‘क्रिकइन्फो’नुसार महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांचा जागतिक स्पर्धांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने म्हटले आहे, की २०२७ आणि २०३१ वन-डे वर्ल्ड कपदरम्यान पुरुषांच्या १२, महिलांच्या सात आणि १९ वर्षांखालील गटाच्या पात्रतेसह पाच स्पर्धा आयोजित केल्या जातील,’ असेही आयसीसीने म्हटले आहे.
जगज्जेती पेरेस निलंबितमोनॅको : बंदी असलेल्या औषधांचे सेवन केल्यामुळे ऑलिम्पिक आणि जागतिक मॅरेथॉन विजेती पेरेस जेपचिरचिर हिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, असे ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने शुक्रवारी सांगितले. केनियाच्या जेपचिरचिरने २०२१मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
मेघनाची निवृत्ती
नवी दिल्ली : भारताची फलंदाज एस. मेघना हिने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. आंध्रच्या या ३० वर्षीय खेळाडूने नोव्हेंबर २०२२नंतर भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही. तिने तीन वन-डे आणि १७ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.