नवी दिल्ली : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष नेहा बोरा यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर शांतता हमीपत्र सादर करण्याचे निर्देश देणाऱ्या पोलिसांच्यी नोटीसला बोरा यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणातील कार्यवाहीदरम्यान नेहा बोरा यांना सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना काही निर्देश दिल्याचेही न्यायमूर्तींनी सांगितले. बोरा यांनी १९ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते.