कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी पाणी बंद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
kalyan dombivli water supply cut for 18 hours
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत १८ तासांसाठी या सर्व केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

या काळात कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळीसह इतर गावांमधील पाणीपुरवठा बंद राहणार असून, परिसरातील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा जपून वापर करत सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या २४ तासांत दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली असून, यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन एमआयडीसीकडून देण्यात आले आहे.