Money Transactions In Bank Accounts Related To Tiger Shroff Shooting Case
सहा खात्यांवरून पैशांचे व्यवहार
Contributed by: मुंबई,म. टा. विशेष प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा बँक खात्यामधून पैसे पुरविण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी या सहा बँक खात्यांची झाडाझडती सुरू केली आहे. दरम्यान, हरियाणा तसेच इतर ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आलेल्या जतीन पांचाळ, समीर खत्री आणि अंकित खटक या तिघांना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जुहू येथील जमनालाल बजाज मैदानावरून फुटबॉल खेळून रविवारी सायंकाळी घरी परतत असताना टायगर श्रॉफच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या.तपासामध्ये सहा बँक खात्यामधून व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अनिल पंडित याच्या सांगण्यावरून हे व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. हे व्यवहार नेमके कोणाकडून कुणाच्या खात्यामध्ये झाले याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.