परिमंडळ ४ मध्ये अमली पदार्थविरोधी सुरू असलेल्या धडक कारवाईमध्ये पोलिसांकडून रोज लाखो रुपयांचे ड्रग्ज आणि गांजा जप्त केला जात आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे अमली पदार्थाच्या अनेक कारवायांमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. गेल्या आठवड्यात जवळपास ७ किलो गांजासह अंबरनाथ पोलिसांनी तीन महिलांना अटक करत जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.