पॅरिस : भारताच्या पी. व्ही. सिंधूने पॅरिस ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीतून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
माजी जगज्जेती आणि दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या चिउ पिन-चियान हिला ३९ मिनिटांत २१-१३, २१-१४ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. उपांत्य फेरीत सिंधूची लढत जपानच्या हिना अकेची हिच्याशी होईल. अश्मिताला जपानची माजी जगज्जेती आणि ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेती नोझोमी ओकुहाराविरुद्ध १०-२१, २१-१७, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.