अज्ञात कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
tragic death of a woman in bhandara hit by an unknown car
भंडारा : कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाला मागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला, तर मुलगा आणि पती गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या गेटसमोरील पुलावर घडली. अश्विनी शिवशक्ती राऊत (३१) रा. वरठी असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये पती शिवशक्ती देवेंद्र राऊत (३२) आणि मुलगा यशब राऊत (३) यांचा समावेश आहे. शिवशक्ती हे त्यांच्या दुचाकीवरून एकलारी गावावरून वरठी येथे परत येत होते. याचदरम्यान, सनफ्लॅग कंपनीच्या गेटसमोरील पुलावर एका अज्ञात कारने त्यांना धडक दिली. या अपघातात शिवशक्ती यांची पत्नी अश्विनी गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. युवकाची २५ लाखांनी फसवणूक उघड

भंडारा : गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भंडारा येथील नेहरू वॉर्डचे रहिवासी प्रेमलाल दोडकू टेंभूरकर (७०) यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये भंडारा येथील खात रोड म्हाडा कॉलनीतील रहिवासी अभिषेक पुरुषोत्तम बांते (३७), पुरुषोत्तम बांते (६१) आणि ओषिण गांधी (३०) यांचा समावेश आहे. आरोपींनी तक्रारदार, टेंभूरकर यांचा मुलगा मयूर टेंभुरकर याला गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवले. त्याच्याकडून वेळोवेळी २५ लाख ६ हजार ८४६ रुपये उकळले. परंतु त्यांनी हॉटेल उघडून दिले नाही. जेव्हा आरोपींकडे पैशांची मागणी केली, तेव्हा औषिण गांधी याने मयुरला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती.
टिप्परच्या धडकेत तरुण ठार, दोघे जखमी

बुलढाणा : अकोला जिल्ह्यातून भुसावळला मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव टिप्परने धडक दिल्याने एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खामगाव तालुक्यात पारखेड फाट्याजवळ २२ ऑक्टोबरच्या रात्री ही दुर्घटना घडली. अकोला जिल्ह्यातील मोठी उमरी येथील रहिवासी प्रज्वल संजय माहुलकर (वय २४), येऊलखेडचा आशुतोष प्रभाकर काकड (वय २४) व मोठी उमरीचा अक्षय देवेंद्र राऊत (वय २३) हे तिघे दुचाकीने भुसावळ येथे मित्राला भेटण्यासाठी निघाले होते. खामगाव तालुक्यातून जाताना पारखेड फाट्याजवळ एमएच-३०-९२९७ क्रमांकाच्या भरधाव टिप्परने स्कुटीला जोराची धडक दिली. यात तिघेही जखमी झाले. डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाल्याने प्रज्वल माहुलकर याचा मृत्यू झाला.