पदवीधर ६२.७८ टक्के; शिक्षक ८५.८७ टक्के

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
voting results of graduate and teacher elections high turnout in pune
पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी उत्साहात मतदान झाले. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत पदवीधर मतदारसंघासाठी ६२.७८ टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी ८५.८७ टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांत मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) होईल.

पुण्यातील मतमोजणी बालेवाडी स्टेडियममधील बॅडमिंटन हॉलमध्ये होईल. ‘पदवीधर’साठी पुणे जिल्ह्यात ७८.०८, तर ‘शिक्षक’साठी ६१.४७ टक्के मतदान झाले. ‘शिक्षक’मध्ये पुणे, ‘पदवीधर’मध्ये सांगली मतदानात पिछाडीवर आहे. अमरावती ‘शिक्षक’मध्ये ९१.०८, नागपूर ‘पदवीधर’मध्ये ६०.६९ आणि औरंगाबाद ‘पदवीधर’मध्ये सरासरी ६० टक्के मतदान झाले.
 सविस्तर वृत्त... २