Order To Freeze Market Committee Bank Accounts Trust Gets Justice After 20 Years Of Legal Battle
बाजार समितीची बँक खाती गोठवणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
(पान १ वरून)
या जमिनीचा मोबदला अत्यंत तुटपुंजा म्हणजे प्रतिचौरस मीटर ४४ रुपये निश्चित झाल्याने ट्रस्टने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने हा दर प्रतिचौरस मीटर २८२ रुपये असा सुधारित केला. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या लढ्यात अंमलबजावणीच्या अटींनुसार बाजार समितीने संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक होते. मात्र, आजवर केवळ ५० लाख रुपयेच न्यायालयात जमा करण्यात आले.दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) शैलेश बाफना यांनी सुनावणीदरम्यान बाजार समिती च्या कारभारावर आणि टाळाटाळीच्या वृत्तीवर कडक ताशेरे ओढले. आदेश होऊन २० वर्षे लोटली, तरी न्यायालयाच्या आदेशांचे पालन झालेले नाही. सार्वजनिक पैसा आणि करदात्यांच्या डोक्यावर व्याजाचा डोंगर उभा राहत असताना बाजार समिती कायदेविषयक बाबींशी लपंडाव खेळत आहे, असे कडक निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
ट्रस्टतर्फे अ ॅड. अनिल आहुजा यांनी, तर बाजार समितीतर्फे अ ॅड. मांडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या निर्णयामुळे तब्बल दोन दशकांनंतर ट्रस्टला न्याय मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत.