Air India Flight Plunges 300 Feet Main Pilot Accused Of Drug Use
हायड्रॉलिक यंत्रणा ठप्प, वैमानिक नशेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानाने सुमारे ३०० फूट गटांगळी घेतल्याप्रकरणी विमान अपघात तपास विभागाने (एएआयबी) शुक्रवारी प्राथमिक अहवाल प्रसृत केला. विमान ३६ हजार फूट उंचीवर असताना तिन्ही हायड्रॉलिक यंत्रणा जवळपास एकाच वेळी निकामी होऊन झालेल्या बिघाडांची मालिका नोंदवत ‘एएआयबी’ने अमली पदार्थाचे सेवन केलेल्या मुख्य वैमानिकावर कारवाई करण्याची शिफारस नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) केली आहे.
एअर इंडियाचे फुकेत-दिल्ली मार्गावरील ‘ए३२० व्हीटी-ईएक्सओ’ (एआय२३७९) विमान ४ ऑगस्ट रोजी उड्डाणादरम्यान अचानक सुमारे ३०० फूट खाली आल्याने प्रवासी आणि कर्मचारी असे एकूण २४ जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी ‘एएआयबी’ने दहा पानी प्राथमिक अहवाल शुक्रवारी सादर केला.‘विमानाच्या हिरव्या, निळ्या आणि पिवळ्या हायड्रॉलिक यंत्रणा जवळपास एकाच वेळी निकामी झाल्या. या हायड्रॉलिक यंत्रणा काही सेकंदांत पुन्हा सुरू झाल्या आणि उड्डाण दिल्लीपर्यंत सुरू राहिले, जिथे ते सुरक्षितपणे उतरले. या प्रकरणी दोन्ही वैमानिकांची (पान ७वर)