‘त्या’ वैमानिकाची हकालपट्टी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
air india pilot termination positive psychoactive test
संबंधित वैमानिकाची सायकोॲक्टिव्ह पदार्थ चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एअर इंडियाने त्याची सेवा तत्काळ समाप्त केली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. ‘सुरक्षा ही एअर इंडियाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. फुकेत-दिल्ली विमानाच्या पायलट-इन-कमांडची सायकोॲक्टिव्ह पदार्थाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुरक्षा, वैमानिकाची तंदुरुस्ती किंवा नियामक नियमांचे उल्लंघन याबाबत कंपनीचे शून्य-सहनशीलतेचे धोरण आहे. त्यानुसार संबंधित वैमानिकाची सेवा तत्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहे,’ अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.