निम्मे अन्न नमुने नापास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
निम्मे अन्न नमुने नापास
अन्न आणि औषधांमधील भेसळ ीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत ‘एफडीए’ने प्रयोगशाळांमधील चाचण्यांचा वेग वाढवत जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये राज्यातून ३७,६०४ अन्न नमुने चाचणीसाठी घेतले. त्यापैकी ३२ हजार ६०४ नमुन्यांची चाचणी पूर्ण करण्यात आली असून, तब्बल १५ हजार २६८ नमुन्यांमध्ये भेसळ आढळली आहे.

या कालावधीमध्ये तपासलेल्या ३० हजार ४९२ अन्न नमुन्यांपैकी १५ हजार १६० नमुने अप्रमाणित ठरले. त्यामध्ये १५ हजार ५५ अंमलबजावणीचे नमुने आणि १०५ निरीक्षण नमुन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय आठ बनावट आणि नऊ नमुन्यांवर चुकीची लेबल असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अन्ननमुन्यांचे संकलन आणि त्यांच्या चाचण्यांच्या प्रमाणात ३४० आणि ४३५ टक्के वाढ झाली आहे.
प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये एकूण १७ हजार ३३६ नमुने प्रमाणित दर्जाचे आढळले. यामध्ये १५ हजार ३३२ अन्न नमुने आणि २ हजार ४ औषधे व सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांचा समावेश आहे.मात्र, चाचणी झालेल्या एकूण नमुन्यांपैकी मोठ्या संख्येने नमुने अप्रमाणित आढळल्याने नियंत्रणासमोरील आव्हान अधोरेखित झाले आहे.