सर्पदंशाने बालकाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या आठवर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मनमाड येथे घडली.

बसस्थानक परिसरात राहणारा व एच. ए. के. हायस्कूलमध्ये पाचवीत शिकणारा अरुण पवार घरी खेळत असताना त्याला सापाने चावा घेतला. उपचारांसाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला मालेगाव येथील खासगी रुग्णालयात पाठविले. मात्र, तेथे पोहचण्याआधी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.