Hate spreading Attacker Arrested In Delhi Arrest Follows Protest
विद्वेषी हल्लेखोर जेरबंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘नीट’ पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या ( सीजेपी ) कार्यकर्त्या निशू आझाद यांच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप असलेल्या स्वतंत्र भारद्वाज याला अटक करावी, या मागणीसाठी ‘सीजेपी’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यासमोर तब्बल तीन तास आंदोलन केले. यानंतर, भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातून ताब्यात घेतले.
‘सीजेपी’चे सहसंयोजक सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शुक्रवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात पोहोचले. आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद तसेच अपक्ष खासदार पप्पू यादवही तेथे दाखल झाले. ‘सीजेपी’चे हे आंदोलन व्हायरल झाले. ‘सीजेपी’ने भारद्वाजविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकी आणि इतर कठोर कलमे लावण्याची मागणी केली. आपल्याला ऑनलाइन शिवीगाळ, बलात्कार, हल्ला करण्याच्या आणि जीवे (पान ७वर)