Heavy Rainfall In North India Flood Situation And Safety Measures
उत्तर भारतात मुसळधार पाऊस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.
नेपाळ, झारखंडमधील अतिवृष्टीमुळे बिहारमध्ये गंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. उत्तर प्रदेशात तब्बल २६ पूरग्रस्त जिल्ह्यांमधून १७ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. हिमाचल प्रदेशात पावसामुळे १०२ रस्ते बंद झाले असून, पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे.