Increase The Number Of Trolleys For Immersion On The Occasion Of Ganesh Festival
विसर्जनासाठी ट्रॉलींची संख्या वाढवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पारसिक विसर्जन घाटावर विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद करण्यासाठी ट्रॉलींची संख्या वाढवावी आणि फोर्कलिफ्टची व्यवस्था करावी, असे आदेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला दिले.
१४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, घाटांची सुरक्षितता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन सुविधा आदींचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, जितेंद्र निकम, मधुकर बोडके, उपनगरअभियंता विकास ढोले, मोहन कलाल, पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त उपस्थित होते.