Inspiring Participation Of Visually Impaired Women In Dahi Handi
दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मुंबई : दहीहंडीच्या थरांवर चढताना नजरेसमोर उंची दिसत नसली, तरी ती गाठण्याची जिद्द मात्र मनात असते. एकमेकींच्या हातात हात देत, आवाजाच्या संकेतांवर विश्वास ठेवत आणि सरावातून आत्मविश्वास वाढवत नयन फाउंडेशनच्या दृष्टिहीन महिला गोविंदा यंदा पुन्हा दहीहंडीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत.
सन २०१४ पासून दृष्टिहीन मुलांचे, तर २०१७ पासून महिलांचे गोविंदा पथक दहीहंडीमध्ये सहभागी होत आहे. यंदा सुमारे २० महिला गोविंदा तीन थरांचे आव्हान पेलणार असून, आषाढी एकादशीपासून त्यांच्या सरावाला सुरुवात झाली आहे. थरांची उंची वाढवत असताना पडण्याची भीती नाही, तर एकमेकींवरचा विश्वास (पान ७वर)