पुणे : फिल्म स्कूलमधील नवोदित चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलतर्फे पहिल्या स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे (स्टुफी) आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये होणाऱ्या या महोत्सवासाठी दहा सप्टेंबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत चित्रपट सादर करता येणार आहेत, अशी माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पानसे यांनी दिली.
चित्रपट सादरीकरणासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. चित्रपटाची निर्मिती एक नोव्हेंबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यानची असावी. दिग्दर्शकाचे वय ३१ जानेवारी २०२७ रोजी १८ ते ३० वर्षे असणे आवश्यक असून, चित्रपटाची ऑनलाइन प्रिव्ह्यू लिंक सादर करून नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी office@stuffi.in या ई-मेलवर संपर्क साधावा किंवा stuffi.in या वेबसाइटला भेट द्यावी.