भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ( इस्रो ) शुक्रवारी ‘ ईओएस-०५ ’ या प्रतिमा घेणाऱ्या उपग्रहाचे (इमेजिंग सॅटेलाइट) यशस्वी प्रक्षेपण केले. सुमारे दोन हजार ३०० किलोहून अधिक वजनाचा हा उपग्रह जीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने अचूकरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला. अंतराळ संस्थेचे या वर्षातील हे पहिले यश ठरले आहे.
सतीश धवन अवकाश केंद्रातून ‘ईओएस-०५’चे प्रक्षेपण झाल्यानंतर सुमारे १८ मिनिटांत त्याला नियोजित उप-भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (पान ७वर)