New Free Guidance Service For Redevelopment Issues
‘रिडेव्हलपमेंट’विषयी विनामूल्य मार्गदर्शन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुनर्विकासासासंदर्भातील (रिडेव्हलपमेंट) प्रश्नांना विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. हे मार्गदर्शन जलद आणि सरकारी स्रोतांवर आधारित असणार आहे. त्याकरिता ‘ड्रीम्स रीडेव्हलप्ड’ संस्थेकडून ‘रिडेव्हलपमेंट गुरू’ ही व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा विनामूल्य सुरू केली आहे.
या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत सदस्य आणि विकासक यांच्यातील माहितीची दरी भरून काढता येणे शक्य होणार आहे.नागरिक पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न थेट व्हॉट्सॲपवर विचारू शकणार आहेत. त्यांना महारेरा नोंदी, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामधील मालकी हक्काचा इतिहास; तसेच संबंधित नियमावली यांसारख्या पडताळता येणाऱ्या स्रोतांशी जोडलेली उत्तरे मिळतील. विकासक, सोसायटी समिती; तसेच वास्तुविशारद, कायदेविषयक व पुनर्विकासतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करताना कोणते प्रश्न विचारावेत याबाबत व्हॉट्सॲपवर आधारित सेवा मार्गदर्शन करील, अशी माहिती ‘ड्रीम्स रीडेव्हलप्ड’चे संस्थापक सनदी लेखापाल (सीए) एस. लक्ष्मीनारायणन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘सुरुवातीला ‘रीडेव्हलपमेंट गुरू’ आणि संबंधित सेवा राज्यभर विस्तारण्याची संस्थेची योजना आहे. सशुल्क सेवांसाठी वेब ॲप्लिकेशन आणि त्यानंतर स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन सुरू करण्याचे नियोजन आहे,’ असे लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले.