‘कोंडी फोडण्यासाठी नवा रस्ता सुरू करा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
new road needed for traffic during ganesh festival
कल्याण : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सव ाच्या निमित्ताने रस्त्यावरील खड्डे मंडळांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबरोबरच उत्सवकाळात शहरातील स्वच्छतेवर भर द्यावा, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३ यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी असुविधांचा पाढा वाचला. दरम्यान, रिंगरोडच्या माध्यमातून दुर्गाडी गणेश घाटालगतच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, हा रस्ता विसर्जन करून जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करावा, ज्यामुळे वाहतूक कोंडी सहज सोडवता येईल, अशी मागणी मंडळांच्या वतीने करण्यात आली. मंडळांनी अन्य मागण्याही केल्या. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून या सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. तर अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी हा उत्सव आनंदात, उत्साहात पार पडावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन केले.