छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी चौकात असलेल्या एशियन हॉस्पिटलच्या नवजात अर्भक अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) कक्ष क्रमांक ११६ मध्ये शुक्रवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रंसगावधानामुळे नवजात अर्भकांचे जीव वाचले.
वॉर्डात आगीची घटना घडताच, रुग्णालयात ॲलर्ट जारी करण्यात आला. एनआयसीयू वॉर्डातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल्ला यांच्यासह परिचारिका, मावशी आणि वॉर्ड बॉय यांनी या कक्षातील लहान मुलांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या वॉर्डात (पान ५वर)