‘विदारक आणि चिंतेची बाब’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
police assault on students supreme courts serious observation
जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला करणे ही विदारक आणि गंभीर चिंतेची बाब आहे, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी शुक्रवारी केले.

एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी त्यांनी जंतरमंतरवरील घटनेवर भाष्य केले. ‘पोलिस अधिकाऱ्यांनी अलिप्त राहून काम करणे अपेक्षित असते. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही, हे खरोखरच गंभीर आहे’, असे न्या. भुयान यांनी नमूद केले.