Pune Zilla Parishad Ideal Teacher Awards Announced For 2025 26
झेडपीचे शिक्षक पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
पुणे : पुणे जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक, केंद्रप्रमुख पुरस्कार अखेर जाहीर झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासूनचे हे पुरस्कार शनिवारी (पाच सप्टेंबर) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. २०२५मध्ये २६ शिक्षक; तसेच एक केंद्रप्रमुख आणि २०२६साठी २६ शिक्षकांसह तीन केंद्रप्रमुखांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्काराची घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केली. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्यातून एक प्रथम आणि एक उत्तेजनार्थ असे दोन पुरस्कार याप्रमाणे १३ तालुक्यांतील एकूण २६ शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. त्यानुसार दोन वर्षांसाठी ५६ शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत.‘अध्यक्ष चषक पुरस्कारासाठी सहा शाळांची निवड करण्यात येते. २०२५मध्ये नऊ आणि २०२६मध्ये आठ शाळांची निवड केली आहे,’ असे जगदाळे यांनी सांगितले.