पोस्टकार्डातून कृतज्ञता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
special gratitude from 1986 batch on teachers day
डी. एस. होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांना ७००हून अधिक पोस्टकार्डे पाठविली. ४० वर्षांपूर्वी शिकविलेल्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पुण्यातील डॉ. दीपाली शाह आणि अहमदाबाद येथील डॉ. शिवांग स्वामिनारायण यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. डॉ. रणजित देशमुख, डॉ. अल्पना गांधी आणि डॉ. सचिन देशमुख यांनीही उपक्रमात सहभाग घेतला.

सध्या शिक्षकदिनाच्या शुभेच्छांसाठी डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या बॅचने त्याऐवजी पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्णय घेतला. हस्तलिखित संदेशातून जुन्या आठवणी आणि शिक्षकांशी असलेला जिव्हाळा व्यक्त करता येईल, या उद्देशाने पोस्टकार्डांची निवड करण्यात आली.