शिका सूत्रसंचालन, डबिंगचे तंत्र

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
special training workshop for dubbing and anchoring
दिवसेंदिवस वाढत जाणार् या चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजसाठी आवाज देणार् या कलावंतांची आज मोठ्या प्रमाणावर गरज आहे. आपल्याजवळ चांगला आवाज असूनही अनेकांना त्याचे कमर्शिअल व्हॉइसिंग आणि डबिंग कसे करावे हे अनेकांना माहिती नसते. व्यावसायिक सूत्रसंचालन कसे करावे याबाबत ते अनभिज्ञ असतात. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक निर्मातेसुद्धा प्रशिक्षित व्हॉइस आर्टिस्टच्या शोधात असतात. ही गरज लक्षात घेऊन ‘मटा कल्चर क्लब’ आणि फिल्मसिटी मीडियाजतर्फे कमर्शिअल व्हॉइसिंग, डबिंग आणि ऑडिओबुक प्रमाणपत्र कोर्सचं आयोजन करण्यात आलं आहे.

सूत्रसंचालक आणि अभिनेते विघ्नेश जोशी, दिग्दर्शक आशिष नेवाळकर, सीरीजसाठी डबिंग करणारे किशोर पूरकर आणि व्हॉइस आर्टिस्ट अमोल मोरे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. फिल्मसिटी मीडियाजच्या कर्वेनगर येथील व्यावसायिक स्टुडिओमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.