Theatrical Academy Award Ceremony And Felicitation Of Artists
सं. नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलावंतांचा सत्कार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे महानगर आणि श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत नाटक अकादमी सन्मान मिळालेल्या पाच कलावंतांचा सत्कार आणि ‘वंदे नटराज राजम्’ हा विशेष कार्यक्रम ठाणे कॉलेजमधील पाणिनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कलागुण गौरव सोहळ्यात तीन घराण्यांच्या गायकीवर प्रभुत्व असलेले पं. अरुण कशाळकर, अभिनेते-निर्माते अरुण नलावडे, नाट्यसंगीत, गायन, अभिनय आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक पं. मुकुंद मराठे, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे पट्टशिष्य शहनाईवादक पं. शैलेश भागवत आणि नाट्य-चित्रपट कलावंत प्रमोद पवार यांचा सत्कार संसदरत्न खासदार नरेश म्हस्के आणि डॉ. मंजिरी देव यांच्या हस्ते झाला. डॉ. मंजिरी देव यांना महामहोपाध्याय पदवी मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी सन्मानित केले. याप्रसंगी संस्कार भारती ठाणे अध्यक्ष डॉ. कीर्ती आगाशे, श्री कौपिनेश्वर न्यास ठाणे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष आणि संस्कार भारती प्रांत उपाध्यक्ष संजीव ब्रह्मे उपस्थित होते.ृ