अनधिकृत बांधकामे पाडली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
unauthorized constructions demolished again in navi mumbai
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर १ येथे तळमजल्यावरील स्कूटर पार्किंगच्या जागेचा अनधिकृतपणे व्यावसायिक वापर करणाऱ्या बांधकामावर महापालिकेने कारवाई केली. शिवशंकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या दुकान क्र. ६ ते ९ लगत पार्किंगच्या जागेत विनापरवानगी बांधकाम करण्यात आल्याचे पाहणीत आढळले होते. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल गेठे आणि उपआयुक्त (अतिक्रमण) संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी कारवाईवेळी उपस्थित होते.