‘आप’चे पदाधिकारीगोम्स यांच्यावर हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
aap leader gomes attacked allegations against bjp worker
शिलाँग :

पणजी : आम आदमी पक्षाचे (आप) गोवा प्रदेश कार्याध्यक्ष गेर्सन गोम्स यांच्यावर सोमवारी दक्षिण गोव्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयात हल्ला झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. या हल्ल्यात गोम्स जखमी झाले असून, हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात माल्कम परेरा याने गोम्स यांना हाताने मारहाण केली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे

हेलिकॉप्टर परतले

सिलिगुडी : अचानक दाट ढग जमा झाल्याने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरला मंगळवारी कालिम्पोंगमध्ये उतरता आले नाही. हेलिकॉप्टर सिलिगुडीला परत आणण्यात आले. त्यानंतर त्यांनी बैठकीला ऑनलाइन उपस्थिती लावली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि नैसर्गिक आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन ही बैठक घेतली.

हिंसाचारातील नुकसानीची भरपाई

शिलाँग : मेघालयातील एका ‘होम स्टे’ची तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेशातील सहा विद्यार्थ्यांनी नुकसान भरपाईपोटी २.०६ लाख रुपये भरल्यानंतर, मेघालय उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धची ‘एफआयआर’ रद्द केली. दोघांना प्रत्येकी २५,००० रुपये भरण्याचे आणि सहा दिवस समाजसेवा करण्याचे निर्देशही दिले.